How To Develops Good Habits In The Children's - मुलांना लावून घ्या या चांगल्या सवयी

How To Develops Good Habits In The Children's - मुलांना लावून घ्या या चांगल्या सवयी -

Develops Good Habits In The Children's
Develops Good Habits In The Children's

१. मुलांना स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

जेव्हा मूल वस्तू जागच्या जागी ठेवतात, तेव्हा मला व्यवस्तित राहायचंय ही भावना मुलांच्या मनामध्ये तयार होते. आणी या भावनेमुळे मुलांचा स्वतःविषयीचा आदरही वाढतो, जो स्वप्रतिमा चांगली होण्यासाठी मदतगार सिद्ध होतो. 

सर्वात महत्वाचं म्हणजे मूल परावलंबी न राहता स्वावलंबी होतात याचं कारण पसारा आवरण्यासाठी आई, घरातली कामवाली बाई हीच जबाबदार आहे अशी बऱ्याच मुलांची समजूत असते. 

मुलांना सर्वात चांगली सवय काय असेल तर स्वतःच टेबल, स्वतःची रूम जिथे ते वावरतात ती जागा आवरून ठेवणं, स्वच्छ ठेवणे.

हि सवय कशी लावाल:

आपल्या मुलाला हे नक्की सांगा की, जी व्यक्ती स्वतःचा आदर करते ती व्यक्ती कधीच गबाळी राहत नाही पण ज्या व्यक्तीला स्वतःविषयी आदर नसतो ती मात्र गबाळी राहते त्याचप्रमाणे मुलांना असे लोक दाखवा, जे अतिशय व्यवस्थित राहतात, याविरुद्ध असे लोकही दाखवा की, ज्यांना स्वतःविषयी आदर नाही आणि त्यांचं घर सुद्धा अस्ताव्यस्त आहे आपोआप मुलाच्या मनात इच्छाशक्ती जागृत होईल की, मी व्यवस्थित राहायला हवं. 

गोष्ट मुलांना त्यांच्या टेबलवर त्यांच्या रूममध्ये कुठे काय ठेवायचं यासाठी जागा निश्चित करून द्या उदाहरणार्थ पेन कुठे ठेवायचा, वही कुठे ठेवायची, दप्तर कुठे ठेवायचं, धुवायचे कपडे कुठे ठेवायचे, धुतलेले कपडे कुठे ठेवायचे, आतल्या कपाटामध्ये कुठल्या गोष्टी कुठे असायला हव्यात, याच्या जागा निश्चित करून द्या. 

सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे ठरलेल्या जागी ठरलेल्या गोष्टी ठेवण्यासाठी मुलांना मदत करा किंवा "ही जागा आहे" याची आठवण करून द्या. जरी मुलांकडून कधी वस्तू जागेवर ठेवली गेली नाही तरी त्यांना चुकूनही रागवू नका. उलट, ज्या वेळेला मुलं एखादी गोष्ट योग्य जागी ठेवतील तेव्हा मनापासून त्यांचं कौतुक करा की, याने ही वस्तू जागेवर ठेवली.

२. डोळे बंद करून शांत बसायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

डोळे बंद करून बसल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल. डोळे बंद केल्यावर मुलांच्या विचार करायच्या पद्धतीत अनेकदा अमोलाग्र बदल झालेला दिसून येतो. तर अनेक मुलांच्यात आपोआप, शांतपणे स्थिरता येण्यासाठी डोळे बंद करून बसायची सवय ही अत्यंत उपयोगी सिद्ध होते. 

डोळे बंद करून बसण्याच्या सवयीमुळे आपोआपच मुलांमध्ये श्रद्धा, भक्ती हे गुण दिसायला लागतील. त्याचबरोबर मुलांचे विचार देखील शुद्ध आणि सकारात्मक होण्यासाठी ही सवय उपयोगी पडेल.

हि सवय कशी लावाल:

लहान मुलांना तुम्ही हे सांगितलं की, अवतरण चिन्ह सुरू डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आतील दुनिया दिसायला लागेल, तुमच्या आतील जग दिसायला लागेल अवतरण चिन्ह पूर्ण तर त्या उत्सुकतेपोटी मुलं डोळे बंद करून बसतील. 

डोळे बंद करून तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला काय दिसतं हा प्रश्न मुलांना विचारा यामुळे मुलं डोळे बंद करून त्यामध्ये बघायचा प्रयत्न करतील पूर्ण विरामचिन्ह तर अनेकदा अशा वेळेस मुलांना त्यांच्या डोळ्यांसमोर वेगवेगळे रंग दिसते, काही चित्र दिसतील. 

ती रंग चित्र काय, हे सांगायला मुलांना भाग पाडा. जर डोळे बंद करून एकाग्र होऊ शकत नसतील तर त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय घडलं हे डोळे बंद करून आठवायला सांगा आणि ते डोळे बंद करूनच तुम्हाला सांगायला सांगा. आपोआप त्यांनाही सवय लागेल. 

अशा प्रकारच्या सवयींमुळे मुलांची एकाग्रता वाढतेच वाढते त्याचबरोबर मुलांची इंद्रिय ही जास्तीत जास्त सामर्थ्यवान व्हायला लागतात. डोळे बंद करून स्वतःचे श्वास मोजायची स्पर्धा जर मुलांमध्ये लावली तर मुलं आपोआपच डोळे बंद करून बसायला लागतात. त्यामुळे डोळे बंद करायची सवय लागतेच लागते त्याचबरोबर त्यांना ध्यानाची ही सवय लागते.

३. एक तरी कला जोपासायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

महत्वाचं म्हणजे मुलांमधील कलागुणांना आपोआप वाहू मिळेल. मुलांची कलेशी मैत्री होईल. प्रत्येक कला ही आनंद देऊन जाते आणि त्याचबरोबर सर्जनशीलतेचा अनुभव देऊन जाते. हा अनुभव जर मुलांनी लहानपणातच घेतला तर जेव्हा ती मोठी होतील तेव्हा या क्षेत्रात ते आपोआप रमतील. या क्षेत्राचा आनंद घेतील. 

कला ही फक्त काही क्षणांपुरती मर्यादित नसते तर, ज्याच्याकडे जी कला असेल ती कला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक भागात डोकावायला लागते. प्रत्येक ठिकाणी कळत नकळत तो कलाकारासारखा वागायला लागतो. आणि ही सवय त्या मुलाला मिळालेली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी देणगी असेल. 

हि सवय कशी लावाल:

सर्वप्रथम, हे समजणं आवश्यक आहे की, आपल्या मुलाला कशात रुची आहे यासाठी मुलांना वेगवेगळ्या कलाकारांनी केलेल्या कला दाखवायला हव्यात , त्या कलेचा आनंद कसा घ्यायचा असतो, हे समजून सांगायला हवं. त्याचबरोबर अशा कलाकारांची त्यांच्याशी भेट घडवून देणं हे देखील ही सवय लावण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतो. 

आपल्या मुलाला रुची असलेल्या कलेचे त्याला क्लास लावून देणे आवश्यक असते. आपल्या घरातील सणवार साजरे करताना आणि प्रत्येक सणाच्या दिवशी आपल्या मुलाला एखाद्या कलेशी कसं जोडता येईल याचा थोडा वेळ विचार केलात तर सहजतेने जाणवेल की, प्रत्येक सण हा नवनवीन कलेला जन्म देण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो, उपयुक्त ठरू शकतो.




४. सकाळी लवकर उठायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

मुलं जर सकाळी लवकर उठली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मुलांचा दिवस लवकर सुरू होईल. जी मुलं लवकर उठतात, सर्वे सांगतो की, ही मुलं जास्त प्रसन्न असतात त्याचबरोबर ती जास्त कार्यक्षम देखील असतात. 
लहान मुलांची सर्वात जास्त ऊर्जा ही सकाळी असते सकाळीच त्यांच्यामध्ये जास्त उत्साह असतो. त्यामुळे सकाळी उठणारी मुलं ही जास्त कार्यक्षम असतातच, त्याचबरोबर त्यांचा उत्साह ही दिवसभर टिकून राहतो.

हि सवय कशी लावाल:

ज्या मुलांची झोप आठ तास पूर्ण होते तीच मुलं लवकर उठू शकतात पूर्ण विरामचिन्ह त्यासाठी मुलांना रात्री वेळेवर झोपण्याची सवय लागणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या घरात सकाळी लवकर जाग असते म्हणजे सगळेजण सकाळी लवकर उठलेले असतात ती मुलं लवकर उठतात. 

ज्या घरात खिडक्या दरवाजे बंद आहेत, बाकी झोपलेले आहेत त्या घरातील मुलं मात्र आपोआपच उशिरा उठायला लागतात. त्यासाठी घरात लवकर जाग येणे हे अत्यावश्यक आहे. ज्या घरात सकाळचं वातावरण हे आनंदी असतं सर्व पसारा स्वच्छ आवरलेला असतो त्या घरातील मुलं लवकर उठतात. 

ज्या घरात आजूबाजूचं वातावरण आळसावलेलं असतं, पसारा तसाच असतो तिथली मुलं म र वेळेवर उठणं, हे मुलांना समजावून सांगितलं तरी देखील मुलं लवकर, वेळेत उठायला सुरुवात करतात.

५: जबाबदारी घ्यायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

त्यांच्यामध्ये नेतृत्व शैलीचा विकास होईलच होईल त्याचबरोबर अशा मुलांचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास, स्व प्रतिमा ही खूप चांगली उंचावलेली दिसेल. अनेक मुलांमध्ये कॉन्फिडन्स दिसत नाही. कारण त्यांच्या लहानपणापासून जबाबदारीची सवय नसते. 

ज्या मुलांच्यात स्वतःहून जबाबदारी घ्यायची सवय असते त्या मुलांची बोलायची पद्धत देखील चांगली असते आणि त्याचबरोबर त्यांचं मन देखील लवकर प्रगल्भ व्हायला सुरुवात होते. जबाबदारी घेण्याची सवय मुलांना लावण्यासाठी त्यांना फार मोठी जबाबदारी देण्याची गरज नाही.

हि सवय कशी लावाल:

बऱ्याचदा, कारण नसताना आपण मुलांना आधार द्यायचा प्रयत्न करतो तो आधार देणं पालकांनी आधी बंद करायला हवं. स्वतःहून हाताने जेवण, स्वतःहून कपडे घालणं, स्वतःच्या गोष्टी स्वतः करणे यासाठी मुलांना उद्युक्त करा. कमीत कमी त्यांची मदत करणे बंद करा. जोपर्यंत मुलं मदत मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मदत देऊ नका. 

कुठल्याही अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर हे करू नको, ते करू नको असं कधीच मुलांना म्हणू नका. उलट, त्या जागी जर तो स्वतःहून फिरत असेल, स्वतःहून काही काम करत असेल, स्वतःहून कोणाशी बोलत असेल तर त्याला मोकळीक द्या. कुठेही ट्रीपला किंवा पिकनिकला तो एकटा जायचं म्हटला तर त्याला नक्कीच सोडा पूर्ण विरामचिन्ह घरात कुठलाही कार्यक्रम असेल तर छोटी का होईना पण एक जबाबदारी मुलाकडे नक्की द्या. 

 त्याचबरोबर बाकीच्यांना काय काय जबाबदाऱ्या दिल्या आहेत तेही नक्की सांगा आणि कुणी कुठली जबाबदारी कशी पार पडली याचाही त्याला निरीक्षण करायला सांगा.



६: शांतपणे बोलण्याची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

शांतपणे बोलणारी मुलं ही जास्त बिचारी असतात आणि ते आपल्या बुद्धीचा चांगल्या पद्धतीने वापर करायला लागतात. शांतपणे बोलणाऱ्या मुलांच्या कृती देखील विचारपूर्वकच केलेल्या असतात. आक्रस्ताळेपणा या मुलांमध्ये कधीच दिसत नाही. 

अशा मुलांमध्ये सहनशक्ती वाढतेच वाढते त्याचबरोबर या मुलांचे मित्र देखील जास्त बनतात.

हि सवय कशी लावाल:

सर्वप्रथम, घरातील सर्वांनी शांतपणे बोलणं आवश्यक आहे हे घरच्यांना समजावून सांगा आणि जाणीवपूर्वक घरात सर्वांनी शांतपणे बोलायला सुरुवात करा. ज्या टीव्हीवरच्या सिरीयल मध्ये दंगा, मोठ्याने ओरडणं अशा गोष्टी आहेत अशा सिरीयल्स मुलांना दाखवू नका. शांतपणे आपलं मन कसं मांडता येतं, याचा प्रत्यक्ष मुलांना करून दाखवा आणि तशी प्रॅक्टिस मुलांकडून करून घ्या. 

जेव्हा मूल शांतपणे बोलतील तेव्हा त्यांचं सगळं ऐकून घ्या. जेव्हा आपण मुलांचं बोलणं मध्येच सोडतो त्यावेळेस मुलं शांतपणा सोडून, चिडून, रागवून, वैतागून बोलायला लागतात. जरी आपलं मूल चिडून, ओरडून, असेल, त्याचा आवाज वाढलेला असेल किंवा त्याच्या बोलण्यात शांती नसेल तरीसुद्धा आई-वडिलांनी जर त्याला शांतपणे उत्तर द्यायला सुरुवात केली तर, काही वेळातच मुलं देखील शांतपणे बोलायला लागतील. 

सर्वात महत्त्वाचं, लहान मुलांना लहान मुल न समजता ती आपल्याच वयाची आहेत असं समजून जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधतात त्यावेळेस ती मुलं अशा सवयी सहजतेने अंगीकारतात. खेळताना मुलं ओरडत असतील दंगा करत असतील तर त्यांना कधीही अडवू नका. उलट, अशा वेळेस त्यांना प्रोत्साहन द्या. पण खेळताना काय झालं, यावर त्यांच्याशी शांतपणे बसून चर्चा केल्यास, मुलांना शांतपणे बोलायची सवय लागते. 

सर्वात महत्त्वाचं, शांतपणे बोलणं म्हणजे माघार घेणं, कमीपणा असं नसून शांतपणे पण ठामपणे आपली मत मांडता येतात हे मुलांना नक्कीच समजावून सांगा.

७. वेळेत झोपण्याची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

जी मुलं लवकर उठतात, वेळेत झोपतात त्यांना पित्ताचा त्रास होत नाही किंवा कमी होतो, हे आयुर्वेदात नेहमी सांगितलं जातं अर्थातच त्याप्रमाणे वेळेत झोपणाऱ्यांची झोप पूर्ण झाल्यामुळे त्यांचे शरीर दिवसभर ताजत आवाहन असतं. यांचा शरीर उत्साही असतं. 

त्याचप्रमाणे जो पूर्ण झाल्यामुळे शरीराबरोबर मनही उत्साही असतं. शरीर आणि मन दोन्ही उत्साही असतं त्यांचे प्रत्येक कार्य हे कार्यक्षमतेने आणि आनंदाने आणि उत्साहाने घडतं हा सर्वात मोठा फायदा या सवयीचा होतो.

हि सवय कशी लावाल:

मुलांनी किंवा पालकांनी एक नियम करायला हवा की, काहीही झालं तरी दिवसा झोपायचंच नाही आणि रात्री वेळेत झोपायचं पूर्ण विरामचिन्ह कधीतरी अभ्यास, काम यामुळे जागरण करणं आवश्यक असतं पूर्ण विरामचिन्ह परंतु बहुतांश वेळेला ही जागरण, अभ्यासामुळे किंवा कामामुळे करणारी मुलं ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकल ची किंवा वरच्या वर्गातली असतात. 

नवीन परीक्षेत लहान मुलांसाठी रात्री जागून अभ्यास करणं हे कधीच योग्य नाही. नवीन परीक्षेत बऱ्याचदा झोप न येण्यामागे मुख्य कारण असतं, ते म्हणजे शरीराची योग्य कार्यक्षमता वापरली न जाणे पूर्ण विरामचिन्ह यासाठी जर मुलांना व्यायाम करायला लावला आणि मैदानी खेळ खेळायला लावले तर त्या मैदानी खेळामुळे किंवा व्यायामामुळेच आपोआपच मुलांचे शरीर योग्य तितकं फक्त आणि त्यामुळे त्यांना वेळेत झोप येते. 

अर्थातच वेळेत झोप आली की, आराम करून मुलं ताजी तवानी होऊन आपल्या उद्योगाला लागतात. त्याचप्रमाणे मुलांना पहाटे उठायची सवय लागली की आपोआपच त्यांना रात्री वेळेत झोप यायला लागते.

८. दिवसातून एक तरी काम मनाविरुद्ध करायची सवय :

ही सवय मुलांना काय देऊन जाईल?

या सवयीमुळे मुलांकडून खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात फक्त कंटाळा हा त्यांचा शत्रू असतो या शत्रूवर त्यांना मात करता येत नाही. या सवयीमुळे मुलांना कंटाळ्यावर कशी मात करावी किंवा नको असलेल्या गोष्टींवर कशी मात करावी, मनाविरुद्ध कसं काम करावं हे कळेल. 

कारण या जगात ज्याला मनाविरुद्ध काम करायला जमतं तो काहीही करू शकतो. यासारखा दुसरा फायदा या सवयीचा अजून कुठलाच असणार नाही.

हि सवय कशी लावाल:

सर्वप्रथम मुलांना हे समजावून सांगणं आवश्यक आहे की, या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडतेच असं नाही. काही गोष्टी मनासारख्या घडणार तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात पूर्ण विरामचिन्ह पण जेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते त्या वेळेला ती स्वीकारता आली पाहिजे आणि त्याची सुरुवात लहान सहान गोष्टींपासून होणं आवश्यक आहे. 

त्यासाठी रोज एक गोष्ट तरी अशी करायची, जी आपल्या मनाविरुद्ध असेल. मग कधी एखादा आवडीचा पदार्थ समोर आला तर तो पदार्थ कितीही खावासा वाटला तरी मी आज खाणार नाही. असं वाटलं की, आज आवडीचा कार्यक्रम टीव्हीवर बघायचा आहे सर्व विरामचिन्ह तर मी आज मुद्दाम तो कार्यक्रम बघणार नाही. 

नवीन परिच्छेद कुठलीही गोष्ट जी तुम्हाला करावीशी वाटते आणि ती मुद्दाम न करणं. अर्थात हे करताना आपल्या आजूबाजूला त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची नक्की काळजी घेणे आवश्यक आहे.


वरील ब्लॉग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments