Ganesh Festival Aarti Sangrah
मराठी आरती संग्रह
Marathi Aarti Sangrah For Ganesh Festival |
मराठी आरती संग्रह - Marathi Aarti Sangrah Lyrics
(थेट संबंधित आरती संग्रहांवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा)गणपतीची आरती | नाना परिमळ- गणपतीच आरती | शंकराची आरती | दुर्गा देवीची आरती | श्री दत्ताची आरती | अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती | अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती | येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती | युगें अठ्ठावीस - विठ्ठलाची आरती | ज्ञानेश्वरांची आरती | घालीन लोटांगण | मंत्रपुष्पांजली
गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा| चंदनाची उटी , कुमकुम केशरा| हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया| जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती॥२॥ लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना | सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना| दास रामाचा, वाट पाहे सदना | संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना| जय देव जय देव, जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
नाना परिमळ- गणपतीच आरती नाना परिमळ दुर्वा शेंदुर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें । ऐसें पूजन केल्या बीजाक्षर मंत्रें । अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति । तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फुर्ती ॥धृ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांचीं सकलहि पापें विघ्नेंही हरती । वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ॥२॥ जय देव शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । किर्ति तयांची राहे जोवर शशितरणी । त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ॥३॥ जय देव..
शंकराची आरती लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥ कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥ देवीं दैत्य सागरमंथन पै केलें । त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ तें त्वां असुरपणें प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचें बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
दुर्गा देवीची आरती दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥ ॥ १ ॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥॥ ध्रु० ॥ त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परन्तु न बोलवे काही॥ साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥ ॥ २ ॥ प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा। क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा॥ अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा। नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥॥ ३ ॥
श्री दत्ताची आरती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा | त्रिगुणी अवतार त्रिलोक्यराणा | नेति नेति शब्द नये अनुमाना | सुरवरमुनिजन योगी समाधी न ये ध्याना || १ || जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव जय देव || धृ || सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैची कळेल हे मात | पराही परतली तेथे कैचा हा हेत | जन्ममरणाचा पुरलासे अंत || जय || २ || दत्त येउनिया उभा ठाकला | भावे सांष्टागेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला | जन्ममरणाचा फेरा चुकविला || जय || ३ ||
अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती || जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थां आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा || जयदेव जयदेव ||ध्रु|| छेली खेडेग्रामी तू अवतरलासी| जगदुध्दारासाठी राया तू फिरसी| भक्त वत्सल खरा तू एक होसी| म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी ||१|| त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार| याची काय वर्णू लीला पामर | शेषादीक शिणले नलगे त्या पार | तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ||२|| देवाधिदेव तू स्वामीराया| निर्जर मूनिजन ध्याती भावे तव पाया | तुजसी अर्पण केली आपली ही काया| शरणागता तारी तू स्वामीराया ||३|| अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले| किर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे| चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले| तुझ्या सूता नलगे चरणावेगळे ||४|| अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ||
अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती जय जय सद्-गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मति दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे। लीलापाशे बध्द करुनिया, तोडिले भवभया रे॥१॥ यवन पूछिले स्वामी कहाॅ है, अक्कलकोटी पहा रे। समाधी सुख ते भोगुन बोले, धन्य स्वामीवर्या रे॥२॥ जाणिसे मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव हरा रे। इतुके देई दीनदयाळा, नच तव पद अंतरा रे॥३॥
येई हो विठ्ठले - विठ्ठलाची आरती येई हो विठ्ठले माझे माउली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । आलिया गेलिया हातीं धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला । गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥ येई हो विठ्ठले माझे माउली ये । विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥
युगें अठ्ठावीस - विठ्ठलाची आरती युगें अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा। पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पाण्डुरंगा| ओ हरी पांडूरंगा ॥ रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥ ध्रु० ॥ तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी॥ देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥ २ ॥ धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाची कमळे वनमाळा गळां। राही रखुमाबाई राणीया सकळा। ओवाळिती राजा विठोबा सांवळा ॥ ३ ॥ ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती। चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती। दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती। दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवाळिती ॥ ५ ॥
ज्ञानेश्वरांची आरती आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा | आरती ज्ञानराजा ||धृ०|| लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी || १ || कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही | साम गायन करी || २ || प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें || ३ ||
घालीन लोटांगण घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे । प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।। त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देव ।। कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् । करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।। अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।। हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।। ।। मंगलमुर्ती मोरया ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।
मंत्रपुष्पांजली ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मस कामान् काम कामाय मह्यं। कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: । ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।। एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोदंती प्रचोदयात् । मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।। ।। गणपतिबाप्पा मोरया ।।
वरील ब्लॉग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.
0 Comments