मराठी उखाणे - Most Popular Marathi Ukhane for Wedding

Marathi Ukhane | मराठी उखाणे
Marathi Ukhane | मराठी उखाणे


Marathi Ukhane | मराठी उखाणे


Marathi Ukhane For Male (नवरदेवासाठी मराठी उखाणे)


1. आंबे वनात कोकिळा गाते गोड, ... आहे माझी तळहाताचा फोड.


2. खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड,  ... च्या रूपात नाही कुठेच खोड.

 

3. उगवला सुर्य मावळला रजनी,  ... चे नाव सदैव माझ्या मनी.

 

4. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,  ... चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.

 

5. आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली ... ला पाहतांच तहान भूक निवली.

 

6. कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर ... च्या मदतीवर माझा सगळा जोर.

 

7. पान, सुपारी, कात आणि चुना याचा बनविला विडा  ... चे नाव घेतो वाट माझी सोडा.

 

8. चंद्राला पाहून भरती येते सागराला ... ची जोड मिळाली संसाराला.

 

9. गणपतीच्या सोंडेला शेंदूराचा रंग । माझी  ... नेहमी घरकामांत दंग.

 

10. हत्तीच्या अंबारीवर मखमालीची झूल माझी ... नाजुक जैसे गुलाबाचे फूल

 

11. उगवला सुर्य मावळला रजनी,  ... चे नाव सदैव माझ्या मनी.

 

12. चांदीच्या ताटात, रूपया वाजतो खणखण,  ... चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.

 

13. सनई आणि चौघडा वाजतो सप्तसुरात,  ... चे नाव घेतो  ... च्या घरात.

 

14. काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,  ... सोबत जीवनात मला आहे आनंद.

 

15. बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,  ... चे नाव घेतो लग्नाच्या राती.

 

16. चंद्र आहे चांदणीचा सांगाती,  ... आहे माझी जीवन साथी.


Marathi Ukhane For Female  (नवरीसाठी मराठी उखाणे)



1. भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची   ... ना घास देते पंगत बसली थोरांची.

 

2. जीवनात ही घडी अशीच राहू दे   ... ची प्रीत सदैव अशीच फुलू दे.

 

3. आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण  ... रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.

 

4. देवासमोर काढले रांगोळी मोराची  ... रावांचे नाव घेते स्नुषा थोराची.

 

5. लावीत हिते कुंकू त्यात सापडला मोती,  ... राव पती म्हणून मिळाले भाग्य मानू किती.

 

6. सत्यभामाने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला  ... रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला.

 

7. पूजेच्या साहित्यातून अगरबत्त्तीचा पुडा  ... रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा घडा.

 

8. छत्रपती शिवरायांसारखा पुत्र, धन्य जिजाउंची ची कुशी,  ... रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी.

 

9. मला नको हिरे मानके,  नको आकाशातले तारे,  ... राव हेच माझे अलंकार खरे.

 

10. समुद्राला कोणी म्हणे सागर कुणी म्हणे रत्नाकर,  ... राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर.

 

11. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र आणि शरदाचे चांदणे, आमचे  ... राव आहेत सर्वामध्ये देखणे.

 

12. आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,  ... रावांना घास घालते गोड जिलेबीचा.

 

13. गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद   ... रावांच्या जीवनात मलाही आनंद.

 

14. कात,चुना, लवंग, पानाचा विडा   ... रावांच्या नावावर भरते लग्नाचा चुडा.

 

15. रजनीचे भांडार शांततेच्या दारी खुलेश, माझे मानस मंदिर   ... रावांनी जिंकले.

 

16. राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात   ... रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात.

 

17. कमलांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात रावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात.

 

18. अश्रू पूर्ण डोळ्यांनी माहेरचा निरोप घेते  ... रावांच्या बरोबर मी गृहप्रवेश करते.

 

19. यज्ञ धर्म कीर्ती ऐश्वर्य आणि संपत्ती   ... रावांचे नाव हेच माझ्या मनाची तृप्ती.

 

20. पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले   ... रावांचे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

 

21. नव्या दिशा नव्या अशा नव्या घरी पदार्पण   ... रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.

 

22. पौर्णिमेच्या चंद्राची उज्वल प्रभा   ... राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा.

 

23. विवाहाच्या सोहळ्यात अत्तर गुलाबाचा थाट   ... रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ भावजयीची गाठ.

 

24. दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस   ... रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस.

 

25. बालपण गेले माता-पिताच्या पंखाखाली, तारुणाच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ, संसाराच्या वेळेला मिळाला   ...   रावांचा प्रेमळ हात.

 

26. नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा   ... रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा.

 

27. निळ्या नभावर असे कर्तुत्वाचा रुपेरी ठसा  ... रावांसह करीत आहे संसाराचा श्री गणेशा.

 

28. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा   ... रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.

 

29. राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात __रावांचे नाव घेते   ... च्या घरात.

 

30. पत्रिका योग जुळून आला जुळून राव पती मिळाले भाग्य थोर म्हणून आई-वडिलांच्या आशीर्वादाने याला भाग्याचा दिवस  ... राव पती मिळाले म्हणून कुलदेवतेला केला नवस.

 

31. आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा,  ... राव पती मिळाले हाच भाग्योदय खरा.

 

32. सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी   ... राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

 

33. गरिबीची करून आनंदा श्रीमंतीचा करणे करता   ... रावांच्या नावांमध्ये अर्पिले जीवन सर्व.

 

34. मनोभावे प्रार्थना करून पूजला गौरीहर   ... रावांच्या सहवास लाभो जन्मभर.

 

35. उंबरठ्यावरचे माप पायाने लोटते   ... राव यांच्या घरात भाग्य आणि प्रवेश करते.

 

36. थोरकुळात जन्मले सुसंस्कारात वाढले   ... रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

 

37. दाराच्या चौकाटीला गणपतीचे चित्र   ... रावांच्या मुळे मिळाले सौभाग्याचे प्रमाणपत्र.

 

38. अंबाबाईच्या देवळासमोर हळदी कुंकवाचा सडा   ... रावांच्या नावावर भरते लग्नचा चुडा.

 

39. जीवनात ही गाडी अशीच राहू दे  ... रावांची प्रीती फुल असेच असू दे.

 

40. वृंदावनी कोणी बाई तुळस लावली   ... रावांच्या संसारात आहे शितल सावली.

 

41. शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार  ... चं सौभाग्य हाच माझा अलंकार.

 

42. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले  ... चे नाव घ्यायला सर्वांनी अडवले.

 

43. दत्ताच्या देवळात धुपाचा वास  ... ला भरवतो मी लाडूचा घास.

 

44. कृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य   ... आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य.

 

45. भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा  ... ला घास देतो / देते लाडूचा.

 

46. माहेरचे निरांजन सासरची वात  ... चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.






वरील ब्लॉग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments